Year: 2024
Type: article
Abstract: मानवी सभ्यतेच्या सुरुवातीला ‘युगलिक व्यवस्था’ होती. नर आणि मादीची अनेक जोडपी होती. प्रत्येक जोडपे नवीन अपत्यांना जन्म देई आणि ही युगलिक प्रक्रिया चालू राही.त्यांच्या जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा वृक्षांमुळे (कल्पवृक्ष) पूर्ण होत. वृक्ष विपुल प्रमाणात असल्याने गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष नव्हता. प्रत्येकजण आनंदी होता. त्यामुळेच शास्त्रकारांनी या युगाला ‘भोगभूमी’ म्हटले. त्यावेळी कुटुंबव्यवस्था, गावे, शहरे नव्हती; त्यावेळचे राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण इतपतच होते. युगलिक व्यवस्थेनंतर विकसित झालेल्या व्यवस्थेला शास्त्रकारांनी ‘कुलकर व्यवस्था’ म्हटले आहे. अनेक जोडपी एकत्र राहू लागली. त्यामुळे कुल बनले, संतती वाढली. कल्पवृक्षाद्वारे जीवन गरजा पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तेव्हा कुलकरांनी आयुष्य प्रवासात पुढे वाटचाल करण्याचे नवे मार्ग शोधले. निसर्गाचे स्वरूप समजून घेतले. संघर्ष टाळण्यासाठी कल्पवृक्षाच्या सीमा निश्चित केल्या. शेती-पशुपालनास सुरवात केली. संघर्ष आणि गुन्ह्यासाठी शिक्षेचे स्वरूप निश्चित केले गेले. जीवन सुरक्षित झाले.कुलकर हे या व्यवस्थेचे केंद्र होते. ते मार्गदर्शन, सुव्यवस्था आणि शिस्तीचे सूत्रधार होते.कुल म्हणून एकोप्याने जगण्याच्या प्रेरणेमुळे त्यांना ‘कुलकर’ म्हटले जाई.ही ‘कुलकर प्रणाली’ पुढे राजेशाहीत विकसित झाली. या विकासयात्रेला हजारो वर्षे लागली.
Language: English
Topic: Indian and Buddhist Studies
Subfield: Religious studies
Field: Arts and Humanities
Domain: Social Sciences
Open Access status: diamond
OpenAlex ID: W4415771390
FWCI:
Cites:
Cited by:
Related to:
