Work

टआरप ससकत आण पतरकरतच मलय

Year: 2026
Type: article
Abstract: प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, ज्यावर समाजाला जागरूक ठेवण्याची आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र, सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) मिळवण्याच्या शर्यतीमुळे पत्रकारितेच्या मूळ नैतिक मूल्यांना तडा जात असल्याचे दिसून येते. नफा मिळवणे आणि जाहिराती आकर्षित करणे या व्यावसायिक उद्देशांमुळे अनेकदा लोकहिताच्या बातम्यांचे बाजारीकरण केले जाते. या संशोधन निबंधात टीआरपी संस्कृतीचा पत्रकारितेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, त्यातील आव्हाने आणि घसरलेली मूल्ये सावरण्यासाठी आवश्यक असलेल्या दिशांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष आणि कुपोषण यांसारख्या ज्वलंत प्रश्नांना अनेकदा टीआरपी मिळत नसल्याने डावलले जाते, या वास्तवावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. अभ्यासाअंती असे स्पष्ट होते की, केवळ खळबळजनक बातम्या देण्यापेक्षा सामाजिक जबाबदारीचे भान राखून पारदर्शक पत्रकारिता करणे ही लोकशाही टिकवण्यासाठी काळाची गरज आहे.
Language: English
Subfield: Communication
Open Access status: bronze
OpenAlex ID: W7156107488
FWCI:
Cites:
Cited by:
Related to: