आनंद यादव यांच्या कादंबऱ्यातील स्त्री चित्रणाचा एक अभ्यास
Year: 2026
Type: article
Abstract: प्रा. डॉ. आनंद यादव यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील स्त्रीचित्रणाचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे. आनंद यादव यांच्या ग्रामीण व आत्मचरित्रपर लेखनातून तत्कालीन ग्रामीण समाजजीवन, स्त्रियांचे दुःख, दारिद्र्य, सासुरवास, पुरुषी वर्चस्व, कौटुंबिक अन्याय आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाचे वास्तववादी चित्रण दिसून येते. प्रस्तुत अभ्यासात ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ आणि ‘नटरंग’ या कादंबऱ्यांतील स्त्री व्यक्तिरेखांचा विशेष विचार करण्यात आला आहे. ‘झोंबी’मध्ये तारा, आकणी व इतर स्त्रियांच्या माध्यमातून स्त्रीला सहन करावा लागणारा कौटुंबिक छळ व सासुरवास, ‘नांगरणी’मध्ये घोडाबाईच्या माध्यमातून स्त्रीच्या विवाहविषयक स्वातंत्र्याचा अभाव, तर ‘घरभिंती’मध्ये सुंदरा व हिराबाई यांच्या माध्यमातून स्त्रीजीवनातील शारीरिक व मानसिक यातना अधोरेखित झाल्या आहेत. ‘नटरंग’मधील दारकीच्या व्यक्तिरेखेतून कलाकाराच्या पत्नीला भोगावा लागणारा सामाजिक अपमान, दारिद्र्य, लैंगिक शोषण आणि कौटुंबिक संघर्ष यांचे चित्रण झाले आहे. या सर्व स्त्री व्यक्तिरेखा विशिष्ट कुटुंबातील असल्या तरी त्या तत्कालीन ग्रामीण समाजातील स्त्रियांच्या व्यापक दुःखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आनंद यादव यांच्या कादंबऱ्यांतील स्त्रीचित्रण हे ग्रामीण स्त्रीजीवनातील विषमता, अन्याय आणि संघर्ष यांचे वास्तवदर्शी प्रतिबिंब ठरते. मुख्य शब्द: झोंबी, स्त्रीचित्रण, घरभिंती, डॉ. आनंद यादव, कादबरी वाङ्मय, आत्मचरित्रात्मक कादंबरी
Author: प्रा. राजा जगताप
Language: Marathi
Subfield: Literature and Literary Theory
Field: Arts and Humanities
Domain: Social Sciences
SDG: Gender equality
Open Access status: diamond
OpenAlex ID: W7204689245
